रिंकू राजगुरु स्वतःला ठेवते अशी फिट, परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:14 PM2021-09-27T15:14:39+5:302021-09-27T15:21:19+5:30

रिंकू राजगुरुच्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की तिच्या फिटनेसबाबत ती किती जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रिंकूचे सौंदर्य अधिक खुलत चालले आहे.

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली रिंकू तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे.

सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे.

आपल्या फिटनेसमुळे इतर अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते.

फिट राहावं परफेक्ट फिगर असावी यासाठी रिंकू बरीच मेहनत घेत आहे.

काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता.

या फोटोतही तिने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केल्याचे पाहायला मिळालं.

तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत आता रिंकूही गणली जात आहे.

दिवसेंदिवस रिंकूही तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश बनत चालली आहे.

तिच्या हटके आणि ग्लॅमरस लूकनेही तरुणाईला अक्षरक्षः वेड लागलंय.