Nityakshi Dyanlakshmi shared photo in village look, see her photos
गावरान साडी चोळीतही ही मराठमोळी अभिनेत्री दिसतेय लय झाक...!, पहा तिचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 08:00 AM2020-06-27T08:00:00+5:302020-06-27T08:00:07+5:30Join usJoin usNext मराठमोळ्या या अभिनेत्रीचे हे फोटो पाहून म्हणाल झक्कास! मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्याक्षी ज्ञानलक्ष्मी हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र नुकतेच तिने गावरान अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये नित्याक्षी खूप सुंदर व सोज्वळ दिसते आहे. तिचे साडी व चोळीमध्ये सौंदर्य खुललं आहे. नित्यक्षी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नित्यक्षी मुळची संगमनेरची आहे. तिने मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने हे बंध रेशमाचे, वृंदावन, मंगळसुत्र, परिजात, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील विविध भूमिकांतून तिने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. मालिकेशिवाय तिने चित्रपटातही काम केले आहे. नगरसेवक एक नायक, वाक्या या चित्रपटात नित्यक्षी झळकली आहे.