मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:44 PM2021-05-04T20:44:52+5:302021-05-04T20:56:15+5:30

अभिनेत्री रुचिता जाधव नुकतीच विवाहबंधनात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव नुकतीच आनंद मानेसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

महाबळेश्वरमधील पाचगणी येथील एका फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत रुचिताचा कुटुंबाच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पाडला आहे.

मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान रुचिता आणि आनंद याचे हे अरेंज मॅरेज ठरले होते.

काहीच दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता.

लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे रुचिता घराघरात पोहचली होती.

मात्र रुचिताने आपल्या कामाची सुरुवात जाहिरातीमधून केली होती. यातून तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता.

रुचिता जाधव हिने ‘लव लग्न लोच्या’सह ‘माणूस एक माती’, ‘मनातल्या’ उन्हात अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.