प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...! मराठी सेलिब्रिटींनी असा साजरा केला व्हॅलेन्टाईन डे

Published: February 14, 2021 03:12 PM2021-02-14T15:12:32+5:302021-02-14T15:26:48+5:30

आज व्हॅलेन्टाईन डे, अर्थात प्रेम दिवस. जगभर आज व्हॅलेन्टाइन डे साजरा केला जात आहे. मराठी सेलिब्रिटीही आजचा दिवस अत्यंत खास अंदाजात साजरा करताना दिसत आहेत.

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर या नुकत्याच विवाह बंधनात अडकलेल्या लव्हबर्ड्सनी अशा रोमॅन्टिक अंदाजात एकमेकांना व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा दिल्यात.

हे हॅपी व्हॅलेन्टाईन, असे लिहित अमृता खानविलकरने पती हिमांशला व्हॅलेन्टाईन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

हॅपी व्हॅलेन्टाईन डे माय हबी, असे लिहत अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नव-यासोबतचा फोटो शेअर केला.

अभिनेता प्रसाद ओक यानेही पत्नीसोबतचा एक झक्कास फोटो शेअर करत, व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा दिल्यात.

अभिनेत्री क्रांती रेडेकर हिने पती समीर वानखेडे यांना व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा देत, एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला.

सोनाली कुलकर्णी हिने होणा-या नव-यासोबतचा फोटो शेअर केला. माय व्हॅलेन्टाईन फॉर लाईफ असे लिहित तिने त्याच्यावरचे आपले पे्रम व्यक्त केले.

प्रेम सतत नव्याने कळणारी आणि जाणवणारी भावना, असे लिहित सुबोध भावेने व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा दिल्यात.

इशा केसकरने बॉयफ्रेन्ड ऋषी सक्सेनाला हटके अंदाजात व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा दिल्यात. विल यू बी माय व्हॅलेन्टाईन (या वर्षी सुद्धा) असे लिहित तिने ऋषी सोबतचा फोटो शेअर केला.

जेनेलियाने आज व्हॅलेन्टाईन डेचे निमित्त साधून पुन्हा एकदा रितेश देशमुखवरच्या प्रेमाची कबुली दिली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!