श्रुती मराठेचा नवरादेखील आहे अभिनेता; दोघांनीही केलंय एकाच चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:11 PM2021-09-23T15:11:41+5:302021-09-23T15:16:29+5:30

Gaurav ghatnekar: गौरव आणि श्रुतीने ४ डिसेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. 'सनई चौघडे' या चित्रपटाच्या माध्यमातून २००९ मध्ये श्रुतीने कलाविश्वात पदार्पण केलं.

'असा मी तसा मी', 'लागली पैज सत्या', 'सावित्री आणि सत्यवान', 'रामा माधव' आणि 'तुझी माझी लव्हस्टोरी' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली श्रुती सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही झळकलेली श्रुती सध्या तिच्या नवऱ्यामुळेच चर्चेत येत आहे. अनेकदा श्रुती तिच्या नवऱ्यासोबतचे म्हणजेच गौरव घाटणेकरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

गौरव आणि श्रुतीने ४ डिसेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

श्रुतीप्रमाणेच गौरवदेखील अभिनेता असून एका चित्रपटाच्या सेटवरच त्यांची मनं जुळल्याचं सांगण्यात येतं.

'तुझी माझी लव्ह स्टोरी' या चित्रपटामध्ये श्रुती-गौरवने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्याचवेळी त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं.

गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.

गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.

मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.