PHOTOS : मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटीलचा बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:09 PM2021-10-18T17:09:05+5:302021-10-18T17:14:53+5:30

pallavi patil : मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोंनी चाहत्यांना जणू वेड लावलं आहे.

मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या ग्लॅमरस फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोंनी चाहत्यांना जणू वेड लावलं आहे.

पल्लवी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतेच तिने स्वत:चे काही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा जणू पाऊस पडतोय. स्टनिंग, हॉट, अप्रतिम अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

पल्लवी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. क्लासमेट या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं.

यानंतर शेंटीमेंटल,सविता दामोदर परांजपे, बॉइज-2, तू तिथे असावे अशा सिनेमात ती झळकली.

‘24’ ही गाजलेली हिंदी वेबसीरिज तुम्हाला आठवत असेलच. या हिंदी वेब सीरिजमध्ये पल्लवीने अनिल कपूर आणि अभय देओल यांच्यासोबत काम केलं आहे.

लवकरच तिचे ग्रे आणि चक्रव्यूह हे तिचे दोन सिनेमे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.