हे मराठी स्टार्स नावापुढे लावत नाही आडनाव, काय आहेत या कलाकारांची आडनावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:14 PM2020-07-02T14:14:19+5:302020-07-02T14:24:05+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार नावापुढे आडनाव लावत नाही. काय आहेत या कलाकारांची आडनावं?

अमृता सुभाष - मराठीतील गुणी अभिनेत्री अमृता सुभाष हिचे खरे आडनाव तुम्हाला माहित आहे? लग्नाआधी अमृताचे नाव अमृता ढेंबरे असे होते. लग्नानंतर अमृता सुभाष कुलकर्णी असे तिचे पूर्ण नाव आहे.

रसिका सुनील - माझ्या नव-याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रसिका सुनील हिला सगळेच ओळखतात. तिच्या नावातील सुनील हे तिच्या वडिलांचे नाव आहे. तिचे पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असे आहे. एवढे मोठे आडनाव न लावता रसिकाने रसिका सुनील असे सुटसुटीत नाव स्वीकारले.

सायली संजीव -गोड चेह-याची ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव ही सुद्धा आपल्या नावापुढे फक्त वडिलांचे नाव लावते. सायली संजीव चांदसारकर असे तिचे पूर्ण नाव आहे.

ललित प्रभाकर - ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर याचे पूर्ण नाव काय? तर ललित प्रभाकर भदाणे. भदाणे हे आडनाव न लावता ललितने ललित प्रभाकर हे नाव स्वीकारले.

भाग्यश्री - ‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेली भाग्यश्रीचे खरे नाव आहे भाग्यश्री पटवर्धन. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज असलेल्या भाग्यश्रीचे लग्नानंतर नाव भाग्यश्री दासानी असे आहे.

अजय-अतुल - आपल्या सुरेल स्वरांनी चाहत्यांना वेड लावणारे अजय-अतुल हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे पूर्ण नाव अजय गोगावले आणि अतुल गोगावले असे आहे. मात्र आडनाव न लावता ही जोडी अजय-अतुल नावाने लोकप्रिय झाली.

रजनीकांत -रजनीकांत यांना आपण साऊथ सुपरस्टार म्हणून ओळखत असलो तरी ते अस्सल मराठी आहेत. मराठमोळे त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.

जयश्री टी - 1958 साली गुंज उठी शहनाई या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात करणाºया अभिनेत्री जयश्री 1960 च्या दशकात अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. जयश्री या त्यांच्या नावापुढे केवळ त्यांच्या आडनावाचे टी हे अक्षर लावतात. त्यांचे पूर्ण नाव जयश्री तळपदे असे आहे. त्यांनी 1989 साली चित्रपट दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी यांच्यासोबत लग्न केले.