मानसी नाईकने केले हटके फोटोशूट, ब्लॅक शर्टमध्ये दिसली खूप ग्लॅमरस

Published: March 7, 2021 06:00 AM2021-03-07T06:00:00+5:302021-03-07T06:00:00+5:30

मानसी नाईक सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

लग्नानंतर मानसी आणि प्रदीप दोघेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

लग्नानंतर मानसी प्रदीपसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र आता तिने तिचे सोलो फोटो शेअर केले आहेत.

मानसीने नुकतेच ब्लॅक शर्टवर फोटोशूट केले आहे.

या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

मानसीने ब्लॅक शर्टमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले आहेत.

मानसीच्या या फोटोतील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

मानसीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत.

याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!