'खफा सौदा..!' म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले लेहंग्यातील फोटो, सोज्वळ अदातून वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 07:00 AM2021-04-10T07:00:00+5:302021-04-10T07:00:00+5:30

सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.

सई ताम्हणकर हिने नुकतीच इंस्टाग्रामवर लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

सई ताम्हणकरच्या या फोटोतील सोज्वळ अदा चाहत्यांना खूप भावत आहेत.

सई ताम्हणकरच्या लेहंग्यातील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.

तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे.