जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस व बोल्ड, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 07:00 AM2021-04-20T07:00:00+5:302021-04-20T07:00:00+5:30

जयवंत वाडकर यांच्या मुलीने 'एफ यू'मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

अभिनेते जयवंत वाडकर यांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तन्मय वाडकर हे त्यांच्या मुलाचे नाव असून स्वामिनी हे मुलीचे नाव आहे.

जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे.

स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या 'एफ यू' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केेले आहे.

तसेच ती सचिन पिळगावकर यांच्या 'ये है आशिकी' या चित्रपटात झळकली आहे.

स्वामिनी सोशल मीडियावर सक्रीय असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

स्वामिनी सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे जयवंत वाडकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी आणि जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी यांचे बारसे एकत्र करण्यात आले होते.

जयवंत वाडकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकीदेखील एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी आणि स्वामिनी या बेस्ट फ्रेंड आहेत.