अभिनेत्री तृप्ती तोरडमलचे ग्लॅमरस फोटोशूट,पाहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 06:50 PM2020-10-21T18:50:50+5:302020-10-21T18:56:56+5:30

आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. स्वप्ना जोशी यांच्या 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमातून ती रसिकांच्या भेटीला आली होती.

अभिनयाने रसिकांवर जादू करणारी तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे.

ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.

अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोशूटमधून तृप्तीने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे तृप्तीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नेहमीच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंंटसचा वर्षाव होत असतो.