गंगे तू किती बदलली गंगे, रिअल लाईफ लूक पाहून तुम्हीही व्हाल क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:51 PM2021-06-17T14:51:53+5:302021-06-17T15:02:18+5:30

मराठी विनोदी चित्रपट आठवताच भलीमोठी लिस्ट चाहत्यांसमोर येते. यात मकरंद अनासपुरे यांचा 'गाढवाचं लग्न' हा सिनेमाचा उल्लेख होणार नाही हे तर अशक्यच. सावळ्या कुंभार आणि त्याचं हुशार गाढव आपल्या सगळ्यांच्या अजुनही समरणात आहे.

'गाढवाचं लग्न' सिनेमात गंगे देखील तितकीच भाव खावून गेली होती.

गंगेची भूमिका प्रचंड गाजली होती.

सिनेमात गावरान अंदाजात झळकलेली गंगा भूमिका साकारली होती अत्रिनेत्री राजश्री लांडगेने.

मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे या जोडीने रसिकांचे तुफान मनोरंजन केले.

रसिकांच्या देखील ही जोडी प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती.

त्यामुळे आजही गंगेला रसिक विसरलेले नाहीत.

रिअल लाइफमध्ये राजश्रीला मॉर्डन रहायला आवडतं.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला आत्ताचा अंदाज बघून आश्चर्य वाटेल.

ऑनस्क्रीन गावरान अंदाजात झळकलेली गंगे ख-या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहे.

राजश्रीने ‘सिटीझन’ सिनेमातही प्रमुख भूमिका साकारली होती.

‘सिटीझन’ सिनेमात ग्लॅमरस भूमिकेत झळकली होती.

गावरान अंदाजातील झळकलेल्या गंगेचाही काळानुसार कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!