सुंदरा मनामध्ये भरली..!, श्रुती मराठेचे साडीतील सौंदर्य पाहून चाहते पडले तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 06:00 AM2021-03-01T06:00:00+5:302021-03-01T06:00:00+5:30

श्रुती मराठेच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.

नुकतेच श्रुतीने राणी कलरच्या सिल्क साडीतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

श्रुतीच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे.

श्रुतीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मराठीत प्रसिद्ध असलेली श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रुतीचा जन्म ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला.

मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत २०१६ साली विवाह केला.