'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊतच्या होणाऱ्या पत्नीला पाहिलंत का?; ती आहे लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 12:59 PM2022-01-15T12:59:36+5:302022-01-15T13:08:07+5:30

सुयश टिळक (Suaysh Tilak) आणि आयुषी भावे (Aayushi Bhave)च्या लग्नानंतर आता गायक रोहित राऊत (Rohit Raut) विवाह बंधनात अडकणार आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत (Rohit Raut ) लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत ( Juilee Joglekar) लग्नबेडीत अडकणार आहे.

नुकतेच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

जुईली जोगळेकर हिने इंस्टाग्रामवर रोहित राऊत सोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, चला. दहा दिवस बाकी आहेत. यावरून ते दोघे २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात.

रोहित व जुईलीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या फोटोंवरून रोहित आणि जुईली लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

२००९ साली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पवार्चा रोहित राऊत विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती.

तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.