अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली..! असंच म्हणाल सोनाली कुलकर्णीचे नऊवारी साडीतील सौंदर्य पाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:00 AM2020-08-31T07:00:00+5:302020-08-31T07:00:00+5:30

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नऊवारी साडीतील फोटोंवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

नुकतेच सोनाली कुलकर्णीने नऊवारी साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोत नऊवारी साडी त्यावर नथ आणि साजश्रृंगार केलेला दिसतो आहे.

सोनाली कुलकर्णी हिचे नऊवारीतील साजश्रृंगार पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

सोनालीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सोनालीचा हा लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यामुळे सध्या सोनाली सोशल मीडियावर आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.

मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.