अमृता खानविलकरची बहीण दिसते फारच सुंदर,वाढदिवसाच्या निमित्त समोर आले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:11 PM2021-11-26T12:11:17+5:302021-11-26T12:31:54+5:30

अमृता खानवलिकरने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे.

सोशल मीडियावर अमृताने बहिणीसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. यावेळी शेअर केलेले फोटो खासच आहे.

अमृताने फोटो शेअर करत आपल्या बहिणीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दोघी बहिणींमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे.

विशेष म्हणजे दोघांनीही साडी परिधान केली आहे.

यासोबतच दोघींचेही लहानपणीचे फोटोही यावेळी तिने शेअर केले आहेत.

यांत चिमुकली अमृता तिच्या बहिणीसोबतचे खास बॉन्डींगही पाहायला मिळत आहे.

अमृताच्या बहिणीचे नाव आदिती खानविलकर बक्षी असं आहे.ही अमृताची लहान बहिण आहे.

दोघींचाही क्युट अंदाज पाहायला मिळतोय.या फोटोंवर रसिकांनी कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केला.