actress shubhangi sadavarte married with anand oak photos are going viral
जन्माच्या गाठी... अभिनेत्री शुभांगी सदावर्तेच्या लग्नाचे हे सुंदर फोटो एकदा पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 02:41 PM2020-07-14T14:41:26+5:302020-07-14T14:58:02+5:30Join usJoin usNext वेडिंग अल्बम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच संगीतकार आनंद ओकसोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते व आनंद ओक यांचा प्रेमविवाह आहे. ११ जुलै रोजी विवाह पार पडला. शुभांगी आणि आनंद ओक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या दोघांनी अगदी छोटासा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम केला. या सोहळ्यात दोघांनीही मास्क लागून विवाह सोहळा संपन्न केला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेली मोजकी मंडळी देखील मास्क घालून सोहळ्याला उपस्थित होते. ‘संगीत देवबाभळी’ नाटकात शुभांगीने आवलीची भूमिका साकारत आहे. आनंद ओक यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. याच नाटकाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. शुभांगी ही 'सावित्रीजोती' मालिकेत चिमणामाईंची भूमिका साकारत आहे.