Actress Neha Pendse is doing this story Miss, photo shared on social media
अभिनेत्री नेहा पेंडसे ही गोष्ट करतेय मिस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 03:38 PM2021-05-01T15:38:30+5:302021-05-01T15:46:42+5:30Join usJoin usNext अभिनेत्री नेहा पेंडसे हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. नुकतेच नेहाने तिचे फोटो शेअर केले आहेत आणि तिने म्हटले की, माझ्या मोठ्या केसांना मी मिस करतेय. पुन्हा केस वाढवू का? नेहा पेंडसेच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नेहा पेंडसेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा पेंडसे सध्या 'भाभीजी घर पर है' मालिकेत काम करताना दिसते आहे. ती मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. तसेच तिचा जून हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला आहे.टॅग्स :नेहा पेंडसेNeha Pendse