अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा आहे बिझनेसमॅन, पहिल्याच नजरेत पडला होता तिच्या प्रेमात

Published: June 17, 2021 09:14 PM2021-06-17T21:14:09+5:302021-06-17T21:21:36+5:30

मृण्मयी देशपांडेचे अरेंज मॅरेज झाले असून ती सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते.

मृण्मयी आणि स्वप्निल सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

३ डिसेंबर २०१६ रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती.

मृण्मयी-स्वप्नीलचे अरेंज मॅरेज झाले आहे.

स्वप्नील मृण्मयीला बघायला गेला होता त्यावेळी मृण्मयीला पाहताक्षणीच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते.

मृण्मयी स्वप्निल या दोघांचेही स्वभावही खूप मिळते जुळते आहेत.

स्वप्नील रावचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही. तो एक बिझनेसमन आहे.

मृण्मयी आणि स्वप्नीलचा सुखी संसार सुरू आहे.

या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूप भावते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!