Lok Sabha Elections 2024: सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:45 AM2024-04-18T11:45:57+5:302024-04-18T11:59:36+5:30

Lok Sabha Elections 2024: १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

१८-१९ वयोगटात १,४१,४५७ मतदार आहेत, २०-२९ वयोगटात १७,५९,३२९, ३०-३९ वयोगटातील २१,५९,३२९ मतदार आणि ८० वर्षांवरील २,२६,४१९ एवढे मतदार आहेत.

१८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार आहेत, जे प्रथमच लोकसभेला मतदान करत आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात ७०,६९८ इतके मतदार आहेत.

त्यापाठोपाठ रामटेक ४६,४१३, भंडारा-गोंदिया ३८,२६९, चंद्रपूर ३७,४८० आणि गडचिरोली-चिमूर ३३,५५९ असे एकूण २,२६,४१९ ज्येष्ठ मतदार आहेत.

येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. - एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

२१ राज्यांतील १०२ मतदारसंघात शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

रिंगणात आठ मंत्री - नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्वांनंद सोनोवाल, संजीव बलियान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, एल. मुरुगन