'365 Days' सारखेच आहेत हॉलिवूडचे हे हिट ठरलेले 'BOLD' चित्रपट, घरातल्यांसमोर बघाल तर होतील वांदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 02:10 PM2022-05-06T14:10:14+5:302022-05-06T14:57:27+5:30

सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या '365 Days' या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो आहे.

काळानुसार चित्रपटांमध्ये खूप मोठा बदल झालेला जाणवतो. बोल्ड विषयांबद्दल बोलणं पूर्वी लोक टाळत असतं. मात्र सध्याचे यंग जनरेशन या विषयावर मोकळेपणाने बोलतात. तसेच आज प्रेक्षकांना बोल्ड आशयाचा कंटेट स्क्रीनवर सहजरित्या पाहायला मिळतो आहे. अशात हॉलिवूडने इरॉटिक किंवा बोल्ड चित्रपटांचा ट्रेंड सुरू केला आहे. ज्यात कथेसोबत सस्पेंस, रोमान्स आणि बोल्ड सीन्स पाहायला मिळतात. सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या '365 Days' या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो आहे.

तसे तर बोल्ड विषयांवर आधारीत चित्रपट यापूर्वीदेखील बनले आहेत. मात्र सध्या किडनॅपिंग, स्टॉकिंग आणि बलात्कारांसारख्या कथा पाहायला मिळत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे '365 Days'.

'365 Days' चित्रपटात डॉन मासीमो, लौरा नामक एका पोलिश तरूणीला किडनॅप करून मोठ्या मेंशनमध्ये ठेवतो आणि तिला त्याच्यावर प्रेम करण्यासाठी ३६५ दिवस देतो. यादरम्यान मासीम, लौरासमोर फ्लाइट अटेंडंट पासून घरकाम करणाऱ्या तरुणींसोबत शरीरसंबंध ठेवतो. त्यानंतर लौरा त्याची गोष्ट मानते आणि मग त्या दोघांचा सेक्सुअल अॅडव्हेंचरला सुरूवात होते.

'365 Days' सारखाच या चित्रपटाचा सीक्वलमध्येदेखील प्रणयदृश्यांचा भडीमार आहे. या सीक्वलचं नाव आहे. '365 Days: This Day'. '365 Days' चित्रपटात रेप आणि किडनॅपिंगच्या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले होते. मात्र निर्मात्यांनी त्या मुद्द्यांवर आपले ठाम मत मांडले. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

असाच इरॉटिक चित्रपटांमध्ये जेमी डोरनन आणि डकोटा जॉन्सनचा चित्रपट फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लेखिका ई एल जेम्स लिखित याच शीर्षकावर आधारीत पुस्तकालाही वाचकांची पसंती मिळाली. मात्र जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला तेव्हा एना आणि क्रिस्टनच्या प्रणयदृश्यांनी सर्वांना चकीत केले होते.

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेचा सीक्वल फिफ्टी शेड्स डार्कर आणि फिफ्टी शेड्स फ्रीडमध्ये देखील सेक्स सीन्सचा भडीमारा होता. दुसऱ्या भागातील तर बरेच सीन्स व्हायरल देखील झाले होते. या चित्रपटात क्रिस्टन एनाचा पाठलाग करतो ही बाब खूप खटकली होती. त्यावरून वाददेखील झाले होते. मात्र बोल्ड सीन्समुळे या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली.

अशीच आणखी एक बोल्ड कंटेट असलेली सीरिज आहे आफ्टर. याचे दोन भाग रिलीज करण्यात आले आहेत. दोन सीरिज प्रदर्शित होणे बाकी आहे.

आफ्टरची कथा हार्डिन आणि टेसाची अवतीभवती फिरते. एका अटीवर हार्डिनने टेसाला पटवतो आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवतो. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. ते दोघे जगातील टॉक्सिक कपलपैकी एक आहे. दोघांना एकत्र राहायचे नव्हते पण सेक्युअल केमिस्ट्री त्यांना जोडून ठेवते. हेच आफ्टर या सीरिजच्या आफ्टर वी कॉलाइडेड आणि आफ्टर वी फेलमध्ये पाहायला मिळते.