काय सांगता, मृत्यूनंतरही हा सेलिब्रेटी दरवर्षी कमावतो कोट्यवधी रुपये, पण कसे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 11:21 AM2021-02-06T11:21:03+5:302021-02-06T11:29:33+5:30

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात.

करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो.

सेलिब्रिटींची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतरही कमी होत नाही.

अशीच काहीशी बाब समोर आली आहे. मृत्यूनंतरही दरमहा कोट्यवधी कमावणा-या सेलिब्रिटींची यादीमध्ये बड्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

काही वर्षापूर्वी फोर्ब्सनं ही यादी जाहिर केली होती.

या यादीत पॉप स्टार मायकेल जॅक्सन अव्वल स्थानावर होते.

किंग ऑफ पॉप नावाने प्रसिद्ध असलेल्या मायकेलची लोकप्रियता त्याच्या मृत्यूनंतरही घटलेली नाही.

2009 साली ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मायकेलचा मृत्यू झाल्यानंतरही तो कोट्यवधीची कमाई करतो आहे.

मायकेल दरवर्षी 48 कोटी रुपये कमावत आहे. आजही, त्याच्या संगीत कंपनीत त्याची भागीदारी आहे आणि त्याच्या संगीताची रॉयल्टी वेगळी आहे.

गेल्या काही वर्षाच्या अखेरीस मायकेलची कमाई साडेचारशे कोटी इतकी होती.

मात्र त्यानंतरच्या काही वर्षात त्याच्या वार्षिक कमाईत घटही झाल्याचे पाहायला मिळाले.

मायकेल जॅक्सन, आईन्स्टाईन यांच्याशिवाय फोर्ब्सच्या या टॉप टेन यादीत बॉब मार्ले, जॉन लेनन, आर्नोल्ड पामर, आणि चार्ल्स शुल्ज यांचाही समावेश आहे.