सर्वात सुंदर अभिनेत्री मर्लिन मनरोची आत्महत्या आजही बनून आहे रहस्य, 'हा' एक परफेक्ट मर्डर मानतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 03:02 PM2020-07-30T15:02:26+5:302020-07-30T15:35:24+5:30

मर्लिनच्या रहस्यमय आत्महत्येच्या फाइल अनेकदा उघडल्या गेल्या, पण नंतर बंद झाल्या. चला जाणून घेऊ मर्लिनची आत्महत्या का आजही एख रहस्य बनून आहे. तिच्या स्वप्नपरी मर्लिन मुन्रो पुस्तकात याबाबत विस्ताराने लिहिले आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची फारच चर्चा रंगली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण पोलिसांकडून शोधलं जात आहे. याआधीही मनोरंजन विश्वातील अनेक आत्महत्या चर्चेच विषय ठरल्या होत्या. यातील काही केसेसचा तर आजपर्यंत उलगडा झालेला नाही. आजही काही आत्महत्यांचं रहस्य समोर आलं नाही. अशीच एक आत्महत्या म्हणजे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुन्रोची. आजही असे अनेक लोक आहेत जे मानतात की, अमेरिकेतील गुप्तहेर संस्था सीआयएने तिला मारले. मर्लिनच्या रहस्यमय आत्महत्येच्या फाइल अनेकदा उघडल्या गेल्या, पण नंतर बंद झाल्या. चला जाणून घेऊ मर्लिनची आत्महत्या का आजही एख रहस्य बनून आहे. तिच्या स्वप्नपरी मर्लिन मुन्रो पुस्तकात याबाबत विस्ताराने लिहिले आहे.

०५ ऑगस्ट १९६२ मध्ये अमेरिकेच्या लास एन्जेलिसच्या सांतामोनिका समुद्र तटावर सकाळी एका कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. त्यात बॉबी डोरिन, एल्पिस प्रेसले आणि डेन शेननसारखे गायक भाग घेणार होते. बरीच गर्दी जमा झाली होती. तेव्हाच डिक्स जॉकीने कार्यक्रमाच्या मधेच श्रद्धांजली गीत ऐकवलं. प्रत्येकजण दु:खात बुडाले होते. काही सेकंदाच्या शांततेनंतर जॉकीने स्वत: सांगितलं की, लोकप्रिय अभिनेत्री मर्लिन मुन्रोने ३६ व्या वर्षी आत्महत्या केली. प्रत्येकावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

लाफोर्ड ही मर्लिनसोबत बोलणारी शेवटची व्यक्ती होती. जेव्हा लाफोर्डला विचारपूस करण्यात आली तेव्हा त्याने सांगितले की, मर्लिनला त्याने डिनरसाठी बोलवलं होतं. पण जेव्हा त्याने तिला सायंकाळी फोन करून डिनरला येण्याबाबत विचारले तर ती चिडचिड करत होती. तिने येण्यास नकार दिला. ती निराश वाटत होती. ती ठिकपणे बोलूही शकत नव्हती.

लाफोर्ड हा सुद्धा हॉलिवूडशी संबंधित होता. त्याने पुढे सांगितले की, जेव्हा त्याने फोन केला तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तिने अडखडत सांगितले की, प्रेसिडेंटला गुडबाय म्हणायचंय आणि तुलाही गुडबाय. त्यानंतर जोपर्यंत लाफोर्ड जिवंत होता तोपर्यंत हीच कहाणी सांगत होता. पण अनेकांना त्याचं बोलणं खोटं असल्याचं वाटत होतं. मर्लिनला प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी आणि त्याच्या भावासोबत नेहमीच बघितलं जात होतं. लाफोर्ड केनेडीच्या भावांच्या जवळचा होता.

मर्लिनबाबत नंतर सांगितलं गेलं की, तिने प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. पण हे नंतर कधीही समोर आलं नाही की, इतक्या झोपेच्या गोळ्या तिच्याकडे आल्या कुठून. तिच्या घरातून गोळ्यांची बॉटली गायब होती. असे मानले जाते की, मर्लिनच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली होती. असेही म्हटले जाते की, काही गुप्त विभागाच्या लोकांनी मर्लिनच्या घरी जाऊन पहिलं काम हे केलं की, फॉक्स स्टुडिओ आणि केनेडी बंधुसंबंधी कागदपत्रे गायब गेली.

अनेक तासानंतर फॉक्स स्टुडिओने अधिकृतपणे माहिती दिली की, रात्री ३.३० मिनिटांनी हाउसटेकर मिसेज यूनाइस मरे ने मर्लिनच्या रूममधील लाइट सुरू असलेला पाहिला. ही अजब बाब होती. त्यांनी दरवाजा वाजवला. पण मर्लिनने उघडला नाही. खिडकीतून पाहिले तर मर्लिन बेडवर बेशुद्ध पडली होती. लगेच पोलिसांना माहिती दिली गेली. दरवाजा तोडला तर मर्लिन मृतावस्थेत पडली होती. पोलिसांनी सांगितले की, मर्लिनने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली.

नंतर केनेडी भावांच्या दबदब्यामुळे सुरूवातील कुणी काहीही स्पष्टपणे बोलू शकत नव्हतं. गपचूप काही चर्चा होत होत्या. जशी केनेडी परिवाराची ताकद कमी झाली मर्लिनच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करणारी पुस्तके आणि लेख प्रकाशित होऊ लागले.

हॉलिवूड स्टारच्या निधनानंतर एका महिला क्राइम रिपोर्टर फ्लोराबेल मुईटने मर्लिनच्या घरातील शेवटच्या तीन दिवसातील टेलीफोन कॉल रेकॉर्ड मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिला सांगण्यात आले की, ते रेकॉर्ड्स फेडरल एजन्ट घेऊन गेलेत. नंतर ते रेकॉर्ड मिळू शकले नाहीत.

मर्लिनच्या अफेअरची चर्चा अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी आणि त्यांचा भाऊ रॉबर्ट केनेडी सोबत रंगली होती. ती त्यांच्यासोबत नेहमी बघितली जात होती. मर्लिनची आत्महत्या नेहमी केनेडीच्या भावांसोबत जोडून पाहिली गेली.

मर्लिनच्या निधनाच्या एक आठवड्यानंतर महिला रिपोर्टर मुईटने आपल्या कॉलममध्ये लिहिलं की, लास एन्जेलि पोलीस विभागावर हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव पडत आहे. हा दबाव मर्लिनच्या शेवटच्या काही दिवसात संपर्कात राहणाऱ्याकडून टाकला गेला.

दोन पत्रकारांनी जेव्हा व्यक्तिगत रूपाने या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा दोघांना असं दिसलं की, मर्लिनच्या जवळच्या लोकांनी एकतर आपला ठिकाणा बदलला आहे किंवा काही उत्तर देत नाहीत. यातील काही लोकांना केनेडी परिवाराच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर बघितलं गेलं. अशीही चर्चा होती की, केनेडीने मर्लिनच्या काही जवळच्या लोकांचे खर्चही उचलले होते.

मर्लिन केसमध्ये तपास करत असलेल्या आणखी एक पत्रकार होडा होपरला हॉलिवूड अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी एका पत्रांची बंडल मिळालं. हे पत्र मर्लिन आणि केनेडी बंधु यांनी एकमेकांना लिहिलेली होती. मर्लिनच्या शरीराचे काही नमूने टेस्टसाठी घेतले गेले होते. पण ते लॅबमधून गायब झाले.

नंतर ज्या शोध पत्रकारांनी या केसबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही सर्व रेकॉर्ड्स आणि पुरावे गायब झाल्याचे समजले. जेव्हा यावर एक पुस्तक लिहिलं गेलं तर त्या लेखकाला कुणी प्रकाशकच मिळाला नाही. कारण त्यात केनेडी बंधुंचा उल्लेख होता. नंतर गुडमनने एक पुस्तक लिहिलं जे केनेडीसोबत मर्लिनच्या संबंधाबाबत होतं. एका प्रकाशकाने पैसे घेऊनही हे पुस्तक छापण्यास नकार दिला.

पण या नंतर या आत्महत्येच्या एक वर्षानंतर राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडीची हत्या झाली. त्याचा भाऊ रॉबर्ट केनेडीने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली तेव्हा देशभरात लपून एक लाल रंगाचं पुस्तक पोहोचवलं गेलं. बघता बघता हे पुस्तक अंडरग्राऊंड बेस्टसेलर ठरलं. असे सांगितले जाते की, विरोधा पक्षाने हे पुस्तक छापलं होतं. याचं टायटल होतं मर्लिनचं रहस्यमय निधन.

या पुस्तकात अनेक विस्फोटक रहस्य उलगडले होते. मर्लिन-केनेडी यांच्यातील फोनवरील संवाद होता. हे पुस्तक सगळीकडे पाठवलं गेलं. हैराण करणारी बाब ही आहे की, मर्लिनबाबत जेवढे पुरावे असू शकतात ते सगळेच गायब केले गेले होते. अर्थातच पुरावे नष्ट करणारे शक्तीशाली लोक असतील.

मर्लिनच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी पुन्हा तिच्या आत्महत्येची फाइल उघडली गेली. चौकशी झाली. पण जास्तीत जास्त परावे-रेकॉर्ड्स नष्ट झाले होते. पण प्रश्न अनेक होते. एक म्हणजे मर्लिनकडे इतक्या गोळ्या कुठून आल्या. गोळ्यांची बॉटल गायब झाली. असे सांगितले गेले की, गोळ्या खाऊन मर्लिनने आत्महत्या केली तर मग रक्तात ड्रग्सचं प्रमाण जास्त कसं आलं. मर्लिनच्या किडनीत ड्ग्स मिळालं नाही. म्हणजे गोळ्या तिने खाल्ल्याच नव्हत्या. तर इंजेक्शन दिलं गेलं होतं. सगळं काही संशय येणारं होतं.

नंतर असं बोललं जाऊ लागलं होतं की, मर्लिन ही प्रेसिडेंट केनेडी यांच्या जवळची होती. त्यामुळे तिला अनेक रहस्य माहीत होते. नंतर असंही बोललं गेलं की, मर्लिन आणि केनेडीचे संबंध बिघडले होते. ती त्याच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेणार होती.

नंतर अमेरिकेतील एक शोध पत्रकार एंथनी स्कादूरो म्हणाले होते की, मर्लिनने आत्महत्या केली नव्हती. तिची हत्या तिच्या जवळच्या लोकांनीच केली होती. सोव्हिएत संघाती ताश न्यूज एजन्सीने तर तिच्या हत्येचा आरोप सीआयएवर लावला होता.

हे तर खरंच आहे की, मर्लिनच्या हत्येनंतर केनेडी परिवाराचा पतन सुरू झालं होतं. जास्तकरून या परिवारातील सदस्य रहस्यमय पद्धतीने मारले गेले होते. पण मर्लिनची आत्महत्या आजही रहस्य बनून आहे. आजही लोक हेच मानतात की, तिने आत्महत्या केलीच नाही. तिची हत्या झाली.