Money Heist season 5: 'मनी हाइस्ट'चा ५वा सीझन कुठे, कसा आणि केव्हा होणार रिलीज?, जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:15 PM2021-09-03T14:15:42+5:302021-09-03T14:25:11+5:30

मनी हाइस्टच्या पाचव्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

'मनी हाइस्ट' या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा सीझन आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'मनी हाइस्ट' ही स्पॅनिश सीरिज असून त्याचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. स्पॅनिश व्यतिरिक्त ही सीरिज इतर अनेक भाषेत पाहू शकतो

‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजचे मूळ नाव ‘कासा डी पॅपेल’ असे आहे. हा एक असा शो आहे ज्याचा पहिला सीझन प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता.

या सीरिजचा दूसरा सीझन संपल्यानंतर जेव्हा नेटफ्लिक्सने याचे जागतिक पातळीवर प्रदर्शित करायचे अधिकार विकत घेतले तेव्हा या सीरिजला नवीन जीवन मिळाले.

नेटफ्लिक्सवर ही सीरिज स्पॅनिश भाषेत होती, पाहता पाहता या शोची लोकप्रियता वाढली आणि याचे डब व्हर्जन देखील आले.

या सीरिजच्या कलाकारांना आणि क्रूला ‘कासा डी पॅपेल’च्या सेटवर परत येण्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी घेतलेली मेहनत स्पॅनिश प्रेक्षकांना फारशी आवडली नाही.

'मनी हाइस्ट'चा पाचवा सीझन दोन भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहिला भाग ३ सप्टेंबर तर दुसरा भाग बरोबर तीन महिन्यांनी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मनी हाइस्ट'चा पहिला भाग ३ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल.

याचा दुसरा भाग ३ डिसेंम्बर रोजी दुपारी १.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल.

ही सीरिज एकूण १० एपिसोडेसची असणार आहे. ज्या पाच पाचच्या २ भागात विभागण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English