अखेर लेडी गागाचे चोरीला गेलेले कुत्रे 2 दिवसांनंतर सापडले, कुत्र्यांवर होतं तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:03 PM2021-02-27T12:03:56+5:302021-02-27T12:57:33+5:30

हॉलिवूड गायक आणि अभिनेत्री लेडी गागाचे दोन कुत्रे चोरीला गेले होते. एका व्यक्तीने लेडी गागाच्या पाळीव कुत्र्यांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. (Photo Instagram)

शुक्रवारी ही दोन्ही कुत्रे परत मिळाले आहेत. लॉस एंजिलिस पोलिसांनी ही माहिती दिली आहे. (Photo Instagram)

एका महिलेने लेडी गागाचे दोन्ही कुत्रे ऑलिम्पिक कम्युनिटी पोलिस स्टेशनमध्ये आणल्याची माहिती आहे. (Photo Instagram)

लेडी गागा तिच्या एका प्रोजेक्टच्या शुटिंगच्या सध्या रोममध्ये आहे. लेडी गागाने कुत्र्यांना शोधून काढणा-याला 3.65 कोटींचे बक्षीस ठेवले होते. (Photo Instagram)

लेडी गागाने तिचे हरवलेले दोन्ही कुत्रे सापडल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. (Photo Instagram)

गागा बर्‍याचदा तिच्या कुत्र्यांसह फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Photo Instagram)

लेडी गागाचं तिच्या कुत्र्यांवर प्रचंड प्रेम असून ती त्यांची काळजी घेण्यात कुठलीही कसर कमी पडू देत नाही. त्यांच्या खाण्या-पिण्यापासून प्रत्येक गोष्टीवर तिचं बारीक लक्ष असतं. (Photo Instagram)

लेडी गागानं या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं होतं. (Photo Instagram)

या सोहळ्यादरम्यान तिचा लूकही चर्चेचा विषय ठरला होता. (Photo Instagram)