‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप

By रूपाली मुधोळकर | Published: December 14, 2020 12:05 PM2020-12-14T12:05:42+5:302020-12-14T12:20:39+5:30

काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी 50 हून अधिक सर्जरी केलेल्या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हीच ती सहर तबार.

हॉलिवूड सुपरस्टार अँजेलिना जोलीसारखे दिसायचे म्हणून चेह-यावर अनेक शस्त्रक्रिया करणारी आणि यानंतर अँजेलिनाची ‘झोम्बी’ अर्थात अँजेलिनाचे भूत म्हणून ओळखली जाणारी इराणची सहर तबार हिला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सहरवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ईशनिंदा, गैरमार्गाने पैसे कमावणे शिवाय तरूणाईला भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तिला सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कारवायांसाठी अटक करण्यात आली होती. आता तिला 10 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी 50 हून अधिक सर्जरी केलेल्या 19 वर्षीय तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हीच ती सहर तबार.

अँजेलिना जोलीसारखे दिसण्याचा नादात सहरचा चेहरा विद्रूप झाल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड चर्चा सुरु होती.मात्र कालांतराने प्लास्टिक सर्जरी फसल्याने चर्चेत आलेल्या या तरुणीने सर्जरी केलीच नसल्याचे समोर आले होते.

आपण मनोरंजनासाठी हा टाईमपास केल्याचा दावा खुद्द सहरने केला होता. मीमेक-अप आणि फोटोशॉपचा वापर करत हे फोटो तयार केले होते. स्वत:चे मनोरंजन करण्याच्या हेतूने आपण हे फोटो पोस्ट केल्याचा दावा तिने केला होता.

मी जेव्हा फोटो पोस्ट केला तेव्हा त्याला अधिक हास्यास्पद आणि मजेदार करण्याच्या दृष्टीने मी तो एडिट केला. हे स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम असून, हे एक आर्ट आहे, असे सहर म्हणाली होता.

आपल्या इन्साग्राम फॉलोअर्सना आपला खरा चेहरा माहिती असल्याचा दावाही तिने केला होता. यानंतर सहरचे खरे फोटोही व्हायरल झाले होते.

Read in English