बाबो,मंगळ ग्रहावर जाण्यासाठी गायिकेची अशीही धडपड, फोटो पाहून भरेल तुम्हालाही धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:24 PM2021-04-16T16:24:33+5:302021-04-16T16:32:40+5:30

सेलिब्रेटी नेहमीच पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे अनेकदा पाहायला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर गायिका ग्रिम्सला कायम चर्चेत राहायला आवडते.

एलन मस्क यांच्या गर्लफ्रेंडचे खरे नाव हे क्लॅरी इलीस बाऊचर असे आहे. मात्र तिला ग्रिम्स नावाने ओळखले जाते.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर मंगळ ग्रहाच्या लाल मातीवर मरण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

या आधी तिने म्हटले होते की, वयाच्या 50 व्या वर्षी तिला मंगळावर राहण्यासाठी जायचे आहे.

या लाल ग्रहावर मानवी वस्ती वसविण्यासाठी मदत केली जाऊ शकेल.

एलन मस्क यांना तिसऱ्या महायुद्धापूर्वी मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवायची आहे.

एलन मस्कपेक्षा आथा ग्रिम्स चर्चेत आली आहे.

पाठीवर तिने एलियन सारखे काही टॅटू गोंधवून घेतले आहेत.

तिचे हे फोटो पाहून धडकी नाही भरली तरच नवल.

सध्या तिच्या चित्र विचित्र फोटोच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तसेच हे टॅटू काढणे प्रचंड वेदनादायी होती, जे कायम स्मरणात राहिल असेही तिने म्हटले आहे.