न्यूझीलंडच्या फलंदाजानं दिला विराट कोहलीला धक्का; IPL 2021पूर्वी बसला मोठा झटका

ICC Men's T20I player rankings इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं खोऱ्यानं धावा चोपल्या. त्यातच त्यानं आगामी आयपीएलमध्ये ( IPL 2021) RCBसाठी सलामीला मैदानावर उतरणार असल्याची घोषणा केली.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं खोऱ्यानं धावा चोपल्या. त्यातच त्यानं आगामी आयपीएलमध्ये ( IPL 2021) RCBसाठी सलामीला मैदानावर उतरणार असल्याची घोषणा केली.

विराट व Royal Challengers Bangalore यांचे चाहते या घोषणेनंतर सुखावले असले तरी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ICC T20 Rankings मध्ये विराटची चौथ्या स्थानावरून घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा २९ वर्षीय फलंदाज डेव्होन कॉनवे ( Devon Conway) यानं त्याला पाचव्या स्थानी ढकललं आहे.

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कॉनवेनं ५२ चेंडूंत ९२ धावांची वादळी खेळी केली होती आणि त्याचा फायदा त्याला ताज्या रँकिंगमध्ये झाला. कॉनवेनं पाच स्थानांची सुधारणा केली आणि ७८४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला. ७६२ गुणांसह विराट कोहली पाचव्या स्थानी सरकला आहे. लोकेश राहुलही ( ७४३) सहाव्या स्थानी घसरला.

अव्वल तीन क्रमांकावर कोणतेच बदल झालेले नाहीत. इंग्लंडचा डेवीड मलान ( ८९२), ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच ( ८३०) आणि पाकिस्तानचा बाबर आझम ( ८०१) हे टॉप थ्री फलंदाज आहेत.

गोलंदाजांमध्ये टॉप टेनमध्ये भारताचा एकही खेळाडू नाही. दक्षिण आफ्रिकेचा तब्रेझ शाम्सी ( ७३३), अफगाणिस्तानचा राशिद खान ( ७१९) व ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन अॅगर ( ७०२) हे टॉप थ्री गोलंदाज आहेत.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले.

वन डे गोलंदाजांत जसप्रीत बुमराहची चौथ्या स्थानी ( -१) घसरण झाली आहे.

कसोटी गोलदाजांत आर अश्विन दुसऱ्या स्थानी कायम आहे.