वय २६ वर्षे, १४० किलो वजन, ६.५ फूट उंची; जाणून घ्या क्रिकेटमधी या वजनदार व्यक्तीबद्दल

२६ वर्षीय रहकिम कोर्नोवॉल असे या खेळाडूचे नाव आहे. कसोटी मालिकेसाठी विंडीजने जाहीर केलेल्या संघात स्थान मिळाल्यापासून कोर्नवॉल चर्चेत होता.

कोर्नवॉलला पहिल्या कसोटीत त्याला संधी देण्यात आली नव्हती. कामगिरीसह त्याच्या वजनाचीच चर्चा अधिक रंगली होती.

अखेर कोर्नवॉलला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.

अँटिग्वा येथे जन्मलेल्या कोर्नवॉलची उंची ६.५ फुट आहे आणि १४० किलो वजन आहे.

कसोटी संघात दाखल होण्यापूर्वी कोर्नवॉलने आपल्या तंदुरुस्तीसाठी बरीच मेहनत घेतली.

विंडीज संघाचे डॉक्टर आणि ट्रेनर कोर्नवॉलच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून होते.

कोर्नवॉलने स्थानिक क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. त्याने ९७ सामन्यांत २४.४३ च्या सरासरीनं २२२४ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व १३ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २६० विकेट्सही घेतल्या आहेत.

कोर्नवॉलच्या फलंदाजीची आता साऱ्यांना उत्सुकता आहे.