PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?

By प्रमोद सरवळे | Published: January 27, 2023 04:34 PM2023-01-27T16:34:57+5:302023-01-27T18:14:29+5:30

काळानुसार अर्थसंकल्प मांडताना कसे बदल होत गेले. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाच्या इतिहासातील विशेष घटना या फोटोस्टोरीतून जाणून घ्या...

आर.के. षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता

मोरारजी देसाई यांनी सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी एकूण 10 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले आहेत जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे.

1973-74 मध्ये इंदिरा गांधी सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला 'काळा अर्थसंकल्प' म्हटले गेले. कारण त्या वर्षातील वित्तीय तूट 550 कोटी रुपये होती.

देश आर्थिक संकटात असताना मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक धुरा खांद्यावर घेतली होती. या अर्थसंकल्पाचे विशेष म्हणजे यावेळी 'लायसन्स राज' संपवून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्विकारले होते

यशवंत सिन्हा यांनी 1999 साली केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करून फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर करण्याऐवजी तो सकाळी 11 वाजता सादर करण्याची परंपरा सुरू केली.

2017 मध्ये, फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी, अरुण जेटली यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू केली.

1 फेब्रुवारी 2021 रोजी निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीच्या काळात पहिला पेपरलेस म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर केला.

2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२६ जानेवारी) अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रांची छपाई सुरू असताना पारंपारिक हलवा सोहळा साजरा करण्यात आला.