१.५ लाख रोजगार, १७५ देश, ४२०० व्यापारी; जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हबचं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:22 PM2023-12-17T12:22:45+5:302023-12-17T12:53:23+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज रविवारी जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब 'सूरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज रविवारी जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब 'सूरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन करण्यात आले.

तब्बल 3400 कोटी रुपये खर्च करून 35.54 एकर जमिनीवर बांधलेले सूरत डायमंड बोर्स (SDB) खडबडीत आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र बनणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज होम ग्राऊंडवर असून सुरतमधील नवीन विमानतळ इमारतीचे उद्घाटनही मोदींच्याहस्ते झाले. त्यानंतर, त्यांचा रोड शो काढण्यात आलाह होता.

मोदींनी उद्घाटन केलेल्या सुरत विमानतळावरील टर्मिनससाठी १६० कोटी रुपये खर्च आला आहे. तर, सुरत विमानतळास केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जाही दिला आहे.

डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्टेड इमारत आहे. कारण, या इमारतीमध्ये 4,500 हून अधिक इंटरकनेक्टेड कार्यालये आहेत. कार्यालयाची इमारत पेंटागॉनपेक्षा मोठी आहे आणि देशातील सर्वात मोठे कस्टम क्लिअरन्स हाऊस आहे.

या इमारतीत 175 देशांतील 4,200 व्यापारी सामावून घेण्याची क्षमता आहे, जे पॉलिश्ड हिरे खरेदी करण्यासाठी सुरतमध्ये येतील. या व्यापार सुविधेमुळे अंदाजे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळेल.

जगाच्या कानाकोपऱ्यातील हिरे खरेदीदारांना सुरतमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागतिक व्यासपीठ मिळेल. उद्घाटनापूर्वीच मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपल्या कार्यालयांचा ताबा घेतला आहे.

या व्यापारांना लिलावानंतर व्यवस्थापनाने हे वाटप केले होते. तसेच, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.

सुरत डायमंड बोर्सने आता पेंटागॉनला मागे टाकून गेल्या 80 वर्षांपासून जगातील सर्वात मोठी कार्यालय इमारत बनवली आहे. तसेच, सुरत डायमंड बोर्स सूरतच्या हिरे उद्योगाची गतिशीलता आणि वाढ दर्शवते. हा देखील भारताच्या उद्योजकतेचा पुरावा आहे, असे मोदींनी यापूर्वीच म्हटले होते.

सुरतमधील हा व्यापार, नावीन्य आणि सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. याशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असेही मोदींनी म्हटले होते.