PHOTOS : कोण आहे सूरज नांबियार? ज्याच्याशी Mouni Roy बांधणार आहे लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:52 PM2022-01-14T13:52:16+5:302022-01-14T14:08:12+5:30

Mouni Roy : कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नानंतर आता चर्चा आहे ती अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची. होय, मौनी लवकरच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नानंतर आता चर्चा आहे ती अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची. होय, मौनी लवकरच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

येत्या 27 जानेवारीला गोव्यात हा लग्नसोहळा होणार असल्याचं कळतंय. आधी हे लग्न दुबईत होणार होतं. पण नंतर गोव्यात ठरलं.

या लग्नासाठी गोव्यातील पंचतारांकित रिसॉर्ट बुक करण्यात आल्याचीही माहिती आहे.

आता मौनीचा होणारा पती सूरज नांबियार कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आज आम्ही त्याच्याचबद्दल सांगणार आहोत. तर सूरज हा दुबईत राहतो. बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी त्याची ओळख आहे.

सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे.

सूरजने अशोक इंडिया या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे.

तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे.

सूरजला ट्रॅव्हलिंग आणि बाईक रायडिंगची आवड आहे. त्याचं इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर हे लक्षात येतं.

आता सूरज व मौनीची ओळख कशी झाली तर दुबईत. लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज एकमेकांना प्रथमच भेटले. लॉकडाऊनदरम्यान मौनी दुबईत अडकली होती. या दिवसांत ती तिच्या बहिणीच्या घरी होती. बहिणीच्या माध्यमातून तिची सूरजसोबत ओळख झाली आणि यानंतर मौनी आणि सूरजची जवळीक वाढली.