लग्नाची सर्व तयारी झाली आणि ऐनवेळी त्याने नकार कळवला...! नीना गुप्ता यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:44 PM2021-06-16T13:44:51+5:302021-06-16T13:53:11+5:30

Neena Gupta :सध्या नीना आपल्या 'सच कहूं तो' या आत्मचरीत्रामुळे चर्चेत आहेत.

आपल्या दमदार अभिनयाने आपली खास ओळख निर्माण करणा-या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्राचे अभिनेत्री करिना कपूरच्या हस्ते प्रकाशन झाले. साहजिकच या आत्मचरित्रानंतर नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत.

या आत्मचरित्राच्या निमित्ताने नीना यांनी इन्स्टावर एक लाईव्ह सेशन सुद्धा केले. या सेशनमध्ये नीना यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासेही केलेत.

आयुष्यात काही छोटे-मोठे अफेअर्स झालेत. पण याव्यतिरिक्त ख-या आयुष्यात माझा कोणताही खरा सोबती नव्हता. मी मुंबईत आले. काही जणांशी नाती जुळली. पण यापैकी एकही रिलेशनशिप पूर्णत्वास गेले नाही. एकूण मी एकटी होते, असे नीना म्हणाल्या.

वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत नीना रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र त्यांच लग्नं नाही झालं, आणि नीना गुप्ता या कुमारी माता बनल्या. या नात्यावरही त्या बोलल्या.

विवियन माझ्या आयुष्यात होता. पण तो खूप दूर होता. शिवाय त्याचे स्वत:चे आयुष्य होते. आम्ही फार क्वचित भेटायचो, असे त्या म्हणाल्या.

एका व्यक्तिने ऐनवेळी नीना यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला, त्याबद्दलही त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीसोबत माझे लग्न ठरले होते. लग्नाची शॉपिंगही झाली होती. पण ऐनवेळी त्याने लग्नास नकार दिला. त्याने असे का केले, मला माहित नाही. पण मी काय करू शकणार होते. मी सगळं विसरून पुढे गेले, असे नीना म्हणाल्या.

त्याच्यासोबत लग्न झाले असते तर मला आनंद झाला असता. मी त्याच्याच घरी जायचे,राहायचे. आज ती व्यक्ति आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे, असे त्या म्हणाल्या. अर्थात त्या व्यक्तिच्या नावाचा खुलासा त्यांनी करणे टाळले.

मी माझे आयुष्य स्वत:च्या अटींवर जगले, जगते, असे लोक म्हणतात. पण मी सुद्धा आयुष्यात अनेकदा चुकले. चूकले त्याक्षणी चूक मान्य करून मी पुढे गेले. मला नेहमीच सर्वसामान्य आयुष्य जगायचे होते. आयुष्यात घर, पती, मुलं, सासू-सासरे असावे असे मला वाटत होते. आज लोकांना सामान्य रिलेशनशिपमध्ये पाहून कधी कधी मला त्यांचा हेवा वाटतो, असे त्या म्हणाल्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English