Shahrukh Khan, Salman Khan Friendship: माझे कुटुंब संकटात असेल तेव्हा सलमानच मदतीला धावून येईल; शाहरुखने 2018 मध्येच सांगितलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 02:48 PM2021-10-13T14:48:23+5:302021-10-13T14:53:30+5:30

Salman Khan helping Shahrukh khan in Aryan khan Rave party case: आर्यन खानवरून बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. काही जण बाजू घेत आहेत. तर काही जण विरोधात बोलत आहेत. 2018 मध्ये सलमानने एक प्रश्न विचारला होता.

बॉलिबूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याचा मुलगा आर्यन खानमुळे (Aryan Khan) अडचणीत सापडला आहे. गेल्या आठवड्याभरापासून शाहरुखचा मुलगा तुरुंगात आहे. अशावेळी बॉलिवूडमधऊन सर्वात पहिला जो मदतीला धावून आला तो सलमान खान (Salman Khan) होता.

आर्यन खानच्या अटकेनंतर सलमान मन्नतवर गेला होता. त्यानंतर काल आर्यनला जामीन मिळण्यास अपयश येत असल्याने सलमानने आपला वकील आर्यनसाठी दिला आहे. (Shahrukh Khan- Salman Khan Friendship.)

आर्यन खानवरून बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. काही जण बाजू घेत आहेत. तर काही जण विरोधात बोलत आहेत. यामध्ये जे बाजू घेत आहेत त्यांना त्यांच्या करिअरची चिंता असेल, तर जे विरोधात बोलत आहेत त्यांना बॉलिवूडच्या गटबाजीने त्रासलेले आहे.

आर्यन खानच्या जामिन याचिकेवर आज विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी होणार आहे. याचट काळात सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सलमानने शाहरुखला आणि त्याच्या कुटुंबाला वाईट प्रसंगांत साथ देण्याचा वादा केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 2018 च्या 'दस का दम' सीझन 3 च्या फिनालेचा आहे. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी हे सेलिब्रेटी म्हणून सलमान खानच्या शोमध्ये गेले होते. या व्हिडीओमध्ये शाहरुख आणि सलमान यांच्यातील मैत्री दिसत आहे, जी आज सलमानने खरी ठरविली आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान खान शाहरुखला विचारतो की, चांगल्या आणि वाईट काळात तुझ्यासोबत कोणी उभा राहिला का? तेव्हा शाहरुखने लगेचच सलमान तू, असे उत्तर दिले होते. मी किंवा माझ्यापेक्षा जास्त माझे कुटुंब जर संकटात असेल तर तूच मदतीला येशील असे शाहरुखने म्हटले होते.

यावर सलमानने हो म्हणत मान हलविली होती. आज सलमान खानच शाहरुखच्या उघडपणे मदतीला आला आहे. शाहरुखने मानशिंदे यांना अपयश आल्याने त्यांना बदलून सलमानच्या वकिलाला आर्यनला जामीन मिळवून देण्याची जबाबदारी दिली आहे.

Read in English