ना कोणी काढला सेल्फी, ना चाहत्यांचा होता तिच्याभोवती गराडा, कारण अभिनेत्रीला कोणी ओळखलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 10:26 AM2021-03-09T10:26:38+5:302021-03-09T10:42:01+5:30

Ileana D'cruz Buying Vegetables In Market सेलिब्रिटींसह फोटा काढावा, त्यांच्यासह सेल्फी असावा,ऑटोग्राफ घ्यावा किंवा मग एक झलक तरी पाहायला मिळावी अशी फॅन्सची इच्छा असते. मात्र मिकविना कधी कधी सेलिब्रेटींना ओळखणेही कठीण होते.

सोशल मीडियावर इलियाना डिक्रुजचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात मुंबईच्या रस्त्यावर फिरतना दिसली होती.

रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना मुंबईच्या रस्त्यावर भाज्या खरेदी करताना दिसली होती.

इलियाना एकटीच इथे भाजीविक्रेत्यांशी मोलभाव करताना पाहायला मिळत आहे.

यावेळी जेव्हा फोटोग्राफर इलियानाच्या जवळ पोहोचले तेव्हाभाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही.

विशेष बाब म्हणजे, अनेक सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या इलियानासोबत ना भाजीवाला आणि ना सामान्य माणसाने सेल्फी काढला.

मीडिया फोटाग्राफर यांनीच इलियाना ओळखले आणि तिचे फोटो काढायला सुरुवात केली.

इलियाना गेल्या अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराचा सामना करते आहे.

ती बॉडी डिस्मॉर्फिया नावाच्या आजाराने पीडित आहे.

आजारावर मात करत इलियानाने पुन्हा ग्लॅमरस लूक मिळवला आहे.