वरुण धवनची भाची अंजिनी धवनने शेअर केले ग्लॅमरस फोटो, ब्लू ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 01:36 PM2021-01-27T13:36:32+5:302021-01-27T13:36:32+5:30

वरूण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान वरूणची भाची अंजिनी धवनच्या सौंदर्याचे सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे.

अंजिनी धवनने इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. अंजिनी धवनचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

वरूण धवनच्या लग्नात वर वधूशिवाय एका क्यूट चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा क्यूट चेहरा म्हणजे वरूण धवनची भाची अंजिनी धवन.

फोटोत अंजिनी ब्लू ड्रेसमध्ये स्टायलिश पोज देताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अंजिनी धवन सध्या सातत्याने फोटोशूट करत आहे. सोशल मीडियावर तिचे अकाउंट पाहून असे वाटतंय की सध्या ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे.

काही दिवसांपूर्वी अंजिनी धवनने हुस्न है सुहाना या गाण्यावर डान्स केला होता जो खूप व्हायरल होता.

अंजनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही पण ती कोणत्या स्टारपेक्षा कमी नाही. ती नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अंजिनी धवन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचे इंस्टाग्रामवर १ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.