PICS : नताशाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता वरूण धवन, फिल्मी आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:05 PM2021-01-20T12:05:34+5:302021-01-20T12:20:19+5:30

या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती वरूण व नताशा सहावीत शिकत असताना.

येत्या 24 जानेवारीला अभिनेता वरूण धवन त्याची बालपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत अलीबागेत लग्नगाठ बांधतोय. या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. नताशा व वरूणची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती वरूण व नताशा सहावीत शिकत असताना.

होय, सहाव्या वर्गात असताना नताशा व वरूण पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.

शाळेत दोघांचीही चांगली गट्टी झाली. मग दोघेही चांगले मित्र बनलेत. 12 व्या वर्गापर्यंत दोघे मित्र होते.

दोघेही मानेकजी कूपर स्कूलमध्ये शिकते. वरूण रेड हाऊसमध्ये होता आणि नताशा यॅलो हाऊसमध्ये. दोघेही एकत्र बॉस्केटबॉल खेळायचे.

नताशा वरूणला फक्त आणि फक्त मित्र मानत होती. पण वरूण कधीच नताशाच्या प्रेमात पडला होता. एकदा लंचब्रेकदरम्यान वरूणला नताशा दूरून चालत येताना दिसली आणि त्या क्षणालाच तो तिच्या प्रेमात पडला.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, नताशाने वरूणला तीन-चारदा रिजेक्ट केले होते. पण वरूणने हार मानली नाही. तो प्रयत्न करत राहिला आणि अखेर त्याचा प्रेमप्रस्ताव नताशाने स्वीकारला.

नताशा एक फॅशन डिझाईनर आहे. न्यूयॉर्कमध्ये ती फॅशन डिझाईन शिकलीय.

ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबधित असूनही नताशा लाईमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

करिअरच्या सुरुवातीला वरूणने नताशासोबतचे रिलेशनशिप लपवून ठवेले. पण अखेर कालांतराने ही लव्हस्टोरी सगळ्यांना कळलीच.

Read in English