Trending: वयाच्या 52 व्या वर्षीही ‘मैंने प्यार किया’ची भाग्यश्री दिसते फारच ग्लॅमरस,तिच्या फिटनेसचे हे आहे गुपित

Published: May 13, 2021 04:44 PM2021-05-13T16:44:21+5:302021-05-13T16:52:49+5:30

1989 साली ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली. सिनेमातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला.

सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार.

योगा करत असल्याचे फोटो खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

'मैने प्यार किया' रिलीजवेळी भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.

भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

तिच्या प्रत्येक फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच असतो.

भाग्यश्रीचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल.

वयाच्या 52 व्या वर्षीही भाग्यश्रीने चांगला फिटनेस मेंटेन केला आहे.

त्यामुळे तिच्या फिटनेसविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या भाग्यश्रीने नुकतेच काही योगा पोझ शेअर केल्या आहेत.

इतर अभिनेत्रींप्रमाणे भाग्यश्रीच्या योगा फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!