सुशांतच्या कुटुंबाला अंकिताचा ‘आधार’, या 7 पोस्टने चाहत्यांनाही दिली हिंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 05:21 PM2020-08-10T17:21:54+5:302020-08-10T17:32:39+5:30

सुशांतच्या आठवणीत अंकिताच्या पोस्ट

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. अशात त्याच्या कुटुंबाची अवस्था काय असेल, याची कल्पना आपण करू शकतो. अशास्थितीत सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुशांतचे कुटुंब व चाहत्यांसोबत भक्कमपणे उभी आहे. तिच्या पोस्टवरून हेच दिसते.

सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिताने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने ‘गॉड्स चाइल्ड’असे कॅप्शन दिले होते.

यानंतर अंकिताने घरातील देवघरात मेणबत्ती पेटवून #Candle4SSR मोहिमेत भाग घेतला होता. तू जिथे असशील तिथे हसत राहा, असे तिने या पोस्टसोबत लिहिले होते.

सुशांतच्या निधनानंतर त्याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ रिलीज झाला होता. हा सिनेमा पाहून अंकिता भावूक झाली होती. पवित्र रिश्ता ते दिल बेचारा असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले होते.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केली होती. यानंतर ‘सत्य जिंकणार’ अशा आशयाची चौथी पोस्ट तिने शेअर केली होती.

सुशांतप्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर अंकिताने पाचवी पोस्ट केली होती. ‘ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आला,’ असे तिने लिहिले होते.

अंकिताची सहावी पोस्टही सुशांतशी संबंधित होती. मला कुठल्याही स्थितीत खरेदी करता वा विकता येणार नाही, अशा आशयाची ही पोस्ट होती.

सातव्या पोस्टमध्ये तिने सुशांतच्या आईचा फोटो शेअर केला होता. आशा करते तू आईसोबत असशील, असे सुशांतसाठी तिने लिहिले होते.