Then & Now पूर्वी अशी दिसायची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा, जुने फोटो पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:58 PM2021-01-12T18:58:37+5:302021-01-12T19:06:25+5:30

देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेतच स्थायिक झाली. भारतात राहत नसली तरी अधून -मधून येत जात असते. सध्या सोशल मीडियावर तिचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत.

प्रियंका सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे.

सुरुवातीचे प्रियंकाचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल.

व्हायरल झालेला फोटोत प्रियंका बारीक दिसत आहे प्रियांकाचा हा फोटो मिस वर्ल्डचा किताब जिंकण्याआधीचा आहे.

व्हायरल होणारे फोटो मिस वर्ल्ड बनण्याच्या अवघ्या एक वर्षापूर्वीचा असून त्यावेळी प्रियंका अवघ्या 17 वर्षांची होती.

प्रियंकाचा हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यावर कमेंटस आणि लाईक्स करत आहेत.

भारतीय सिनेमाच नाही तर जगभरातल्या सिनेप्रेमींवर आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी सौंदर्यवती म्हणून प्रियंका ओळखली जाते.

तिच्या या फोटोंवर चाहतेच नाहीतर सेलिब्रेटीही कमेंट करत आहेत.

30 नोव्हेंबर 2000 रोजी प्रियंका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

लंडनच्या मिलेनियम डोममध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रियांका चोप्राने आपल्या उत्तरासह जजेसचीही मनं जिंकली होती.

2000 मध्ये जेव्हा प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा ती अवघ्या 18 वर्षांची होती.

मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला. प्रियांकाने 2003 मध्ये 'हीरो' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.