'सिंघम' अ‍ॅक्ट्रेस काजल अग्रवालचा साडी अंदाज एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:29 PM2019-07-24T15:29:38+5:302019-07-24T16:54:52+5:30

काजल अग्रवालचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.... तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.

साडीतल्या वेगवेगळ्या अदांनी जणू काही काजलच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.

काजलने साडी परिधान केली असून कपाळावर टिकली आणि साजेसे दागिणे घातल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

'सिंघम' सिनेमातून अभिनय आणि आपल्या सोज्वळ सौंदर्याने काजलने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

काजल बॉलिवूड सिनेमा क्वीनचा तमीळ रिमेक पेरिस पेरिसमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश अरविंद करत आहेत.

तसेच मेकअप फक्त बाहेरील सौंदर्याला सुंदर बनवते. ते आपल्याला व्यक्ती म्हणून ओळख देतो का? किती योग्य म्हटले आहे की आपण किती चांगले आहोत, असा स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे असे मत काजलने मांडले होते.