सुश्मिता सेनला डायमंड गिफ्ट करणं कोणालाच नाही शक्य; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 06:14 PM2021-10-17T18:14:52+5:302021-10-17T18:23:54+5:30

आपल्या जोडीदाराने हिऱ्याचा एखादा दागिना भेट दिला तर कोणाला आवडणार नाही? अपवाद फक्त सुश्मिता.

सुश्मिता सेन बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. तूर्तास सुश्मिताची चर्चा आहे ती हिऱ्यामुळे.

हिरा हा स्त्रीला हवाहवासा वाटतो. आपल्या जोडीदाराने हिऱ्याचा एखादा दागिना भेट दिला तर कोणाला आवडणार नाही? अपवाद फक्त सुश्मिता.

होय, कारण हिरा किंवा हिऱ्याचा एखादा दागिना गिफ्ट करण्याची परवानगी सुश्मिताने कोणालाही दिलेली नाही. अगदी तिच्या बॉयफ्रेन्डलाही नाही.

अगदी इच्छा असूनही बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल सुश्मिताना हिरा भेट देऊ शकलेला नाही. सुश्मिताने त्याला यासाठी परवानगी दिलेली नाही.

मी माझ्या कोणत्याही जवळच्या व्यक्तिला मला हिरा गिफ्ट करण्याची परवानगी दिलेली नाही. कारण मी स्वत: माझ्यासाठी हिरा खरेदी करते. प्रियजनांकडून हिरा भेट म्हणून स्वीकारणे मला अजिबात आवडत नाही, असे सुश्मिता म्हणाली.

एका जुन्या मुलाखतीत सुश्मिताला हिऱ्याबद्दल बोलली होती. मला डायमंड गिफ्ट करणा-या व्यक्तिची गरज नाही. मी स्वत: स्वत:ला हिरा गिफ्ट करू शकते, असे ती म्हणाली होती.

सुश्मिता दीर्घकाळापासून रोहमनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती आर्या या वेबसीरिजच्या दुस-या सीझनमध्ये दिसणार आहे.

Read in English