Sushant Singh Rajput Birth Anniversary: सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसादिवशी पाहा त्याचे हे सुपरहिट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:16 PM2022-01-21T18:16:43+5:302022-01-21T18:16:43+5:30

सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)ने 'काय पोछे' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.

सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आता या जगात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात तो कायम राहील. सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सुशांतने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर फार कमी वेळात वेगळी ओळख निर्माण केली होती.

सुशांत सिंग राजपूतने 'काय पोछे' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या 'द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या कादंबरीवर आधारित आहे, ज्याचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे.

२०१६ मध्ये रिलीज झालेला एम एस धोनी हा चित्रपट भारतीय क्रिकेटर एम एस धोनीचा बायोपिक आहे. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. सुशांतच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट होता ज्याने १०० कोटींची कमाई केली होती.

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट ३ एप्रिल २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. ब्योमकेश बक्षीच्या भूमिकेत त्याच्या अभिनयाची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली होती.

सुशांत सिंग राजपूतचा 'केदारनाथ' हा चित्रपट ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. सारा अली खानचा डेब्यू चित्रपट सुशांतसोबत आहे. या चित्रपटात सुशांतने मन्सूर खानची भूमिका साकारली होती, जो भाविकांना पालखीतून केदारनाथला घेऊन जातो.

सुशांत सिंग राजपूतचा 'सोनचिरैया' हा चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत चंबळचा डाकू बनला होता. या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

सुशांतचा मोठ्या पडद्यावरचा शेवटचा चित्रपट 'छिछोरे' ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर बंपर कमाई केली. सुशांतचा हा चित्रपट २०१९ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता.

'दिल बेचारा' हा सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट होता. मात्र, कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. त्याच्या निधनानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने व्ह्युव्हरशीपच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केले.