बेकरीत करायची काम, मग कशी झाली पॉर्न स्टार? अशी आहे सनी लिओनीच्या आयुष्याची कथा

Published: May 13, 2021 11:25 AM2021-05-13T11:25:30+5:302021-05-13T11:35:23+5:30

Sunny Leone Birthday : सनी लिओनीला पॉर्न स्टार म्हणून सगळेच हिणावतात, पण तिचा हा ‘स्ट्रगल’ माहितीये का?

अ‍ॅडल्ट स्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिचा आज (13 मे) वाढदिवस. 13 मे 1981 रोजी जन्मलेल्या सनीचे खरे नाव करणजीत कौर आहे.

इंटरनेटवर ‘मोस्ट सर्च्ड पीपल’च्या यादीत स्थान मिळवणारी सनी सुमारे 82.20 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. तिच्याकडे अनेक महागड्या अलिशान गाड्या आहेत. एका चित्रपटासाठी सनी 4.5 कोटी रुपये घेते़ खरे तर सनी लिओनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले. पैशांसाठी दिर्घकाळ तिने या बेकरीत स्वत:ला वाहून घेतले होते. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब घेतला होता. बेकरीत काम करत असताना सनी पॉर्न इंडस्ट्रीकडे कशी वळली, याचीही एक कथा आहे.

होय, सनीची एक मैत्रिण होती. ती डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची भेट घालून दिली. ही भेट झाली आणि सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. याच करिअरसाठी ती करणजीतची सनी लिओनी बनली.

सनी पॉर्न इंडस्ट्रीत काम करायची. पण यासाठी तिच्या काही अटी होत्या. सनीने मे २००७ मध्ये सहा अ‍ॅॅडल्ट सिनेमे साईन केले होते. पण यासाठी तिने एक अट ठेवली होती. तिच्या सर्वच पॉर्न सिनेमांमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड मेट एरिक्सन तिच्यासोबत होता. त्यावेळी केवळ मेटसोबत म्हणजेच तिच्या तेव्हाच्या होणा-या पतीसोबत तिने अ‍ॅडल्ट सिनेमात काम केले होते. त्याव्यतिरिक्त तिने समलैंगिक सिनेमांमध्ये काम केले.

मेट एरिक्सन हा प्लेबॉय एंटरप्राइजचा व्हाईस प्रेसीडेट आॅफ मार्केटिंग होता. 2008 मध्ये त्याचे आणि सनीचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर सनीने मेटसोबत काम करण्यास नकार दिला. यामुळे मेट चांगलाच नाराज झाला होता. इतका की, संतापून त्याने सनीचे आणि त्याचे काही प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केले होते.

या ब्रेकअपनंतर सनी प्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सला डेट करत होती. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. नंतर सनीने 2011 मध्ये 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर डॅनिअल वेबरसोबत लग्न केले.

लग्नानंतर मात्र सनीच्या आयुष्यात बराचसा बदल झाला. तिच्या पतीला तिनं पॉर्नस्टार म्हणून काम करणं आवडत नव्हते़ त्याने कधीही त्याबाबत तिला थेट सांगितले नाही पण त्याच्या एकंदरीत हावभावातून तिला ते जाणवायचे़ अखेर तिने एकेदिवशी आपल्या प्रेमासाठी पॉर्न इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला व बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

तिला हिंदी येत नाही म्हणून अनेक जण तिची खिल्ली उडवतात, ती पॉर्नस्टार असल्यामुळं अनेकजण तिच्यासोबत काम करण्यास नकार देतात पण सनीला याचा काहीही फरक पडत नाही.

तिच्या मते ती लहानपणापासून संघर्ष करते अन् त्याची आता सवय झाली आहे. तर अशा प्रकारे सनी लिओनीने आपल्या पतीसाठी पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि लहानपणापासूनची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती बॉलिवूडमध्ये आली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!