सुनील ग्रोव्हरची पत्नी दिसते एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 06:00 AM2021-04-21T06:00:00+5:302021-04-21T06:00:02+5:30

कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे सुनील ग्रोव्हरला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही सुनीलने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत.

कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनीलने द कपिल शर्मा शो ला रामराम ठोकला होता.

सुनील ग्रोव्हरची पत्नी अतिशय सुंदर असून ती अनेकवेळा त्याच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावते.

सुनील ग्रोव्हरच्या पत्नीचे नाव आरती असून त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

सुनीलला एक मुलगा देखील असून तो देखील अनेकवेळा त्याच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसतो.