दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनची सून सामंथा आहे भलतीच ग्लॅमरस, जगभरात आहे तिचे चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:00 AM2020-06-03T06:00:00+5:302020-06-03T06:00:00+5:30

दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामंथा रूथ प्रभुची गणना केली जाते.

दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामंथा रूथ प्रभुची गणना केली जाते. (PHOTO INSTAGRAM)

कॉलेजमध्ये असताना प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक रवी वर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी तिला ‘मास्कोविन कावेरी’ या चित्रपटाची आॅफर दिली.

'मैया चेसवे', 'रंगस्थलम', 'नीथेन एन पोनसांथम', 'यतो वेल्लिपोइन्धी मनसु', 'सीतम्मा विट्ठितलो सिरिमल चेट्टू' यासारख्या सिनेमात समांथा झळकली आहे.

या सिनेमातील तिच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली.

तिच्या अभिनयामुळेच तिने रसिकांची पसंती मिळवली आहे.

जगाच्या कानाकोप-यात आज समांथाचे चाहते आहेत.

सामन्था अक्केनेनी ही दक्षिण सुपरस्टार नागार्जुनची सून आहे.

2017 मध्ये समांथाने नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले.

हे दोघेही टॉलीवूडमधील सर्वात रोमँटिक कपलपैकी एक आहेत.

सामंथा आज कोट्यावधीची मालकीण आहे.