महेश बाबू व नम्रता शिरोडकरच्या 8 वर्षाच्या लेकीने केले फोटोशूट, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 03:49 PM2021-02-22T15:49:33+5:302021-02-22T16:14:41+5:30

आता ही सितारा किती वर्षाची तर फक्त आठ वर्षांची. पण तिचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे.

साऊथ सुपरस्टार महेशबाबू त्याच्या स्टाईल आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याची पत्नी नम्रता शिरोडकर ही सुद्धा कधीकाळी बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री होती. महेशबाबू व नम्रताची चर्चा या ना त्या कारणाने होतेच. पण आता या कपलच्या लेकीची चर्चा होतेय. (इन्स्टाग्राम)

होय, महेश बाबू व नम्रता शिरोडकरची लेक सितारा घट्टामनेनी हिच्या फोटोशूटची जोरदार चर्चा रंगलीये. (इन्स्टाग्राम)

आता ही सितारा किती वर्षाची तर फक्त आठ वर्षांची. पण तिचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे आणि या अकाऊंटवर तिने स्वत:चे फोटो शेअर केलेत. (इन्स्टाग्राम)

या फोटोत सितारा कमालीची सुंदर दिसत आहेत. साहजिकच सिताराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (इन्स्टाग्राम)

काही फोटोत सितारा गुलाबी रंगाच्या शॉर्ट फ्रॉकमध्ये आहे. हा सुंदर फ्रॉक घालून तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

सिताराने मागच्याच वर्षी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले.

अवघ्या वर्षभरात तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे.

सध्या 3 लाखांपेक्षा अधिक लोक सिताराला फॉलो करतात.

आई वडिलांप्रमाणेच सिताराही अभिनयात करिअर करायचे आहे. त्याची चुणूक आत्तापासूनच दिसू लागली आहे.

सन 2000 मध्ये नम्रता ‘वामसी’ या तेलगू चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होती. याच चित्रीकरणादरम्यान तिची महेशबाबूशी ओळखझाली होती. ही ओळख नंतर मैत्रीत बदलली आणि पुढे प्रेमात.

2005 नम्रता व महेशबाबूने लग्नाचा निर्णय घेतला. आता नम्रता व महेशबाबूच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली आहेत. या दोघांची दोन मुले आहेत. मुलगा गौतम आणि मुलगी सितारा.

1998 मध्ये सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटामधून नम्रताने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर पुकार , वास्तव , हेराफेरी , अस्तित्व , कच्चे धागे , तेरा मेरा साथ रहे आणि एलओसी: कारगिल अशा अनेक हिट सिनेमांत नम्रता दिसली.

महेशबाबू हा दिग्गज तेलगू अभिनेता कृष्णा याचा लहान मुलगा आहे. सहा वर्षांच्या वयात बालकलाकार म्हणून त्याने आपल्या अ‍ॅक्टिंगला सुरुवात केली होती.