या पोस्टसाठी किती पैसे मिळाले? ट्रोलरच्या प्रश्नाने भडकली सोनम कपूर, वाचा पुढे काय झालं

Published: May 14, 2021 07:36 PM2021-05-14T19:36:48+5:302021-05-14T19:46:42+5:30

Sonam Kapoor : ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. सोनम कपूरसाठी तर अजिबात नाही. आता काय तर सोनमने ईदच्या शुभेच्छा दिल्यात आणि ती ट्रोल झाली.

ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. सोनम कपूरसाठी तर अजिबात नाही. आता काय तर सोनमने ईदच्या शुभेच्छा दिल्यात आणि ती ट्रोल झाली.

ईदच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ सोनमने इन्स्टावर शेअर केला आणि यानंतर ट्रोलर्स अ‍ॅक्टिव्ह झालेत.

सोनमने तिचा डेब्यू सिनेमा ‘सांवरिया’चे एक गाणे सोशल मीडियावर शेअर करत ईद मुबारक म्हटले. पण लोकांनी लगेच तिला ट्रोल करणे सुरू केले.

एका ट्रोलर्सने मात्र मर्यादा लांघली, ‘ईद मुबारक म्हणायचे किती पैसे मिळाले?’, अशा शब्दांत या युजरने सोनमला ट्रोल केले.

सोनम मागे हटणारी नव्हतीच़ तिने ताबडतोब या युजरला ब्लॉक केले. ट्रोलरला त्याच्याच शब्दांत उत्तर देण्याऐवजी तिने त्याला ब्लॉक करणे पसंत केले.

ब्लॉक करतानाची स्क्रीन रेकॉर्डिंग तिने इन्स्टा स्टोरीला शेअर केली. सोनम कपूरने या युजरला ब्लॉक करताना ‘गुंडगिरी’ आणि ‘छळ’ हा पर्याय निवडला.

याआधीही सोनम अनेकदा ट्रोल झाली आहे. कधी कपड्यांवरून तर कधी तिच्या परखड विधानावरून.

सोनम कपूर सध्या पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहतेय.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘ब्लाइंड’ या सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!