तु त्याला हॉट समजतेस? पुन्हा एकदा बघ! नवर्‍याला कुरूप म्हणणार्‍या मुलीवर भडकली सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:11 PM2020-09-18T15:11:24+5:302020-09-18T15:21:14+5:30

ट्रोल होणे ही सोनमसाठी नवी गोष्ट नाही. याआधी अनेकदा ती ट्रोल झाली आहे. पण...

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जबरदस्त ट्रोल होत आहेत. सोनम कपूर त्यापैकीच एक.

स्टारकिड्स लोकांच्या निशाण्यावर आहेत. अशात सोनम कपूरही स्टार किड्स असल्याने तिला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. खरे तर ट्रोल होणे ही सोनमसाठी नवी गोष्ट नाही़ याआधी अनेकदा ती ट्रोल झाली आहे. पण एका टीका सोनम कपूरच्या इतकी जिव्हारी लागली की, हे ऐकणे प्रचंड वेदनादायी असल्याची ती म्हणाली.

तर त्याचे झाले असे की, सोनम कपूरला ट्रोल करणा-यांनी तिच्यासोबत तिचा पती आनंद आहुजा यालाही ट्रोल केले.

इन्स्टाग्रामवर एका मुलीने सोनला ट्रोल करताना कुठलीही कसर सोडली नाही. ‘अ‍ॅक्टिंग कशी असते, हे तरी तुला माहित आहे का? तू नेपोटिजमची प्रॉडक्ट आहेत आणि हो, तुला वाटतं तुझा पती हॉट आहे. पण त्याला एकदा पुन्हा बघ. कारण तो सर्वात कुरूप माणूस आहे,’ असे या मुलीने लिहिले.

या मुलीचा हा मॅसेज पाहून सोनम कपूर भडकली. ‘लोकांचा मेंदू अशा पद्धतीने काम करतो? अशा गोष्टी ऐकणे प्रचंड वेदनादायी आहे. कोणबद्दल इतकी नकारात्मकता आणि द्वेष मनात ठेवणे चांगले नाही,’ असे सोनम कपूरने यावर उत्तर देताना लिहिले.

ही मुलगी आणि सोनम कपूर यांच्यात असे ‘युद्ध’ रंगले असताना अचानक या वादाला एक नवे वळण मिळाले. होय, माझे अकाऊंट हॅक झाले आहे, असे संबंधित हेटरने लिहिले. म्हणजे, मी सोनम कपूर व तिच्या नवºयाबद्दल असे काही लिहिलेच नाही, असे तिने सांगितले. तेव्हा कुठे या वादावर पडदा पडला.

2014 मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती.

दोघांचीही कॉमन फ्रेण्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे.

2014 मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होत महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि मे 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले.

आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकाठीर्चे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे.

Read in English