Memes : श्रद्धा कपूर बनणार बॉलिवूडची नवी 'इच्छाधारी नागीण', पब्लिकने अशा दिल्या प्रतिक्रिया

By अमित इंगोले | Published: October 29, 2020 03:48 PM2020-10-29T15:48:58+5:302020-10-29T15:55:39+5:30

श्रद्धा कपूर इच्छाधारी नागीणची भूमिका साकारणार म्हटल्यावर ट्विटरवर मीम सेना सक्रिय झाली. अनेकांनी श्रद्धा कपूरवर काही मजेदार मीम्सही तयार केले.

हिंदी सिनेमात इच्छाधारी नागीणची कॉन्सेप्ट जुनी आहे. मोठा पडदा असो वा छोटा पडदा २१व्या शतकातही इच्छाधारी नागीणचा फॉर्म्यूला हिट आहे. सर्वांनाच माहीत आहे की, नागीण बनून अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास केला. श्रीदेवीपासून ते मनीषा कोईरालापर्यंत अभिनेत्रींनी नागीणची भूमिका साकारल्या आहेत. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, श्रद्धा कपूर इच्छाधारी नागीण बनून बॉलिवूडची प्रथा पुढे कशी नेते. श्रद्धा कपूर इच्छाधारी नागीणची भूमिका साकारणार म्हटल्यावर ट्विटरवर मीम सेना सक्रिय झाली. अनेकांनी श्रद्धा कपूरवर काही मजेदार मीम्सही तयार केले.

श्रद्धाने ट्विटरवर लिहिले की, 'स्क्रीनवर नागीणची भूमिका साकारणं माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मी श्रीदेवी मॅमचा 'नागीण' आणि 'निगाहे' बघत मोठी झाली आहे. त्यांच्या कामाने आणि अंदाजाने मला नेहमीच प्रभावित केलं आहे. मला नेहमीच अशी भूमिका साकारण्याची इच्छा होती'. या ट्विटला ७ हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

या सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं नाही. पण विशाल फूरिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. त्याने २०१७ मध्ये मराठी सिनेमा 'लपाछपी'चं दिग्दर्शन केलं होतं. तर या सिनेमाची निर्मिती निखील द्विवेदी करणार आहे. यात लव्हस्टोरी अॅंगलही आहे. पण अजून श्रद्धासोबत हिरो कोण असेल हे ठरलेलं नाही.

Read in English